व्यक्तिमत्व

जाणता लोकनेता

महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलण्याचे श्रेय म्हणजे एकनाथ शिंदे. आता, मुख्यमंत्री या नात्याने, त्यांनी त्यांच्या प्रशासनाचा आधारस्तंभ म्हणून निर्णायक, जलद गतीने आणि लोककल्याणभिमुख कृती सुनिश्चित करून प्रभावी प्रशासनाला प्राधान्य दिले आहे.

ठाणे महापालिकेतील सभागृह नेते आणि नंतर ज्येष्ठ मंत्री या नात्याने त्यांनी जनतेच्या गरजांची जाण असलेला एक सक्षम प्रशासक असल्याचे सिद्ध केले होते.

आता गोरगरिबांची ताकद वाढवून त्यांचा विकास प्रक्रियेत समावेश करण्याचे काम शिंदे प्रशासन करत आहे. भारतातील सर्वात औद्योगिक राज्य म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्व करत, भारताच्या जीडीपीमध्ये किमान 20% योगदान देऊन देशातील औद्योगिक क्षेत्रात आपले अग्रगण्य स्थान कायम ठेवण्याची त्यांची दृष्टी आहे.

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन - मित्र या संस्थेची स्थापना केली आहे. मित्राचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून सह-अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. सर्वसमावेशक डेटा विश्लेषण आणि विविध क्षेत्रांबाबत अभ्यासपूर्ण निर्णय घेण्यासाठी MITRA ही राज्याची थिंक टँक असेल. 2027 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन आणि 2047 पर्यंत $3.5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे एकनाथ शिंदे यांचे ध्येय आहे.

‘जनहिताय सर्वदा’ किंवा ‘सर्वांचे कल्याण, सदैव’ हे आपले तात्विक ध्येय ठेवून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहकारी संघराज्य वाढवण्याच्या प्रवासात शिंदे प्रशासन पुढे जात आहे.