team Image

महाराष्ट्राचे लोकनाथ


त्यांचे राजकीय गुरू धर्मवीर श्री आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक जीवनाची ओळख करून दिली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी राजकीय सत्तेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणले.

team Image

प्रारंभिक जीवन


९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाराष्ट्रातील सातारा येथे जन्मलेले एकनाथ शिंदे हे मराठा कुटुंबातील आहेत. त्यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी ठाण्यात आले.

team Image

राजकीय प्रवास


कठोर परिश्रम आणि सामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठीचे प्रयत्न व जनतेशी अथक बांधिलकीच्या जोरावर, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री झाले.

आमच्या विषयी

एकनाथ शिंदे साहेब

एकनाथ शिंदे हे तळागाळातील लोकनेते असून ते एका गरीब कुटुंबातील आहेत. हिंदुहृदयसम्राट वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर श्री आनंद दिघे यांच्या ज्वलंत भाषणांनी प्रेरित होऊन त्यांनी हिंदुत्व तत्त्वज्ञानाचा अवलंब केला आणि लोकांसाठी काम सुरू केले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे हे सक्षम वृत्तीची प्रेरणा देतात. या प्रवासात तुमच्या विचारांनी आणि कृतीने त्याला सामील करा.

शिक्षण

एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून ११वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परंतु, शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. सन २०१४ ते २०१९ हा पाच वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली आणि ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले. श्रीकांत एकनाथ शिंदे हे एमएस (ऑर्थो) असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
सन १९९७ साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली. त्यात ते विजयी झाले. सन २००१ मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली. सन २००१ ते २००४ अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. मात्र, केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. सन २००४ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते. जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले. दिनांक ३० जून २०२२ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
सन २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने त्यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. ठाण्यातील महत्त्वाची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, ठाण्यासाठी मेट्रो, ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवे विस्तारित ठाणे स्थानक, पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांबरोबरच सागरी सुरक्षा, पोलीस दलाचे आधुनिकीकरण, वाढती महागाई, राज्याच्या डोक्यावर वाढते कर्ज अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि सागरी सुरक्षा बळकट करण्याची घोषणा केली. परंतु, कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात सागरी सुरक्षा अत्यंत कमकुवत आहे, सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच आहे, अशी एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात अनेकदा आपल्या भाषणांमधून टीका केली.
2019 च्या प्राप्त अहवालानुसार, एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या सुमारे 7 कोटी 82 लाख रुपयांची संपत्ती आहे. त्याच्या बँकेत जमा केलेली रक्कम ₹ 281000 आहे. त्याचवेळी त्यांच्याकडे ३२६४७६० रुपये रोख आहेत. याशिवाय त्यांच्याकडे रोखे आणि डिबेंचर्समध्ये 30,591 रुपये आहेत. याशिवाय त्याच्याकडे एलआयसी आणि इतर पॉलिसी मिसळून ५०,०८,९३० आहेत. याशिवाय त्यांच्याकडे मोटार आणि विविध दागिन्यांसह 8000000 रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व जमिनीची किंमत ₹ 2800000 आहे. त्यांच्याकडे रु.3000000 ची व्यावसायिक मालमत्ता आहे.
img02
Mission Image

वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वारसा

"राज्याच्या विकासाला माझे प्राधान्य आहे. मी समाजातील सर्व घटकांना सोबत घेईन."

एकनाथ शिंदे यांच्या वक्तृत्वातून त्यांचा उद्देशाचा प्रामाणिकपणा, रंगमंचावर लोकांमधला त्यांचा आराम आणि मुख्य म्हणजे समाजात सकारात्मक बदल घडवण्याची त्यांची तळमळ स्पष्टपणे दिसून येते. तो जोडण्यासाठी हसतो आणि त्याच्या विधानांचे गांभीर्य व्यक्त करण्यासाठी त्याच्या प्रेक्षकांच्या डोळ्यात पाहतो. त्याचे सहज वागणे आणि हाताच्या सूक्ष्म हालचालींमुळे त्याला प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात मदत होते.