अजित दादा पवार यांनी राजकारणामध्ये पुन्हा दमदार आगमन केले. २०१९ यावर्षी विधानसभा निवडणूकी मध्ये बारामती मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजय मिळवला. त्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली. अजित दादा पवार त्यांच्या राजकीय जीवनात व समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी आरोग्यसेवा आणि शिक्षण, समाजकल्याण या कार्यक्रमांना पाठबळ देऊन सातत्याने समाजाच्या चांगुलपणाने काम केले आहे. अजित पवारांनी सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीची परवान करतात, राज्याच्या नागरिकांच्या भल्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करून राज्यात विविध योजना राबवल्या.
अजित पवारांनी त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात १९९१ यावर्षी लोकसभा निवडणूक लढवून केली. लोकसभा निवडणूक जिंकून दादा पहिल्यांदा बारामतीचे खासदार बनले. दादांना त्यांच्या वडिलांचे व काकांचे मार्गदर्शन असल्यामुळे व त्यांची स्वतःची जनसामान्यांची जोडून घेण्याची क्षमता तसेच कार्यकर्त्यांची कामे करणे या मदतीच्या गुणामुळे अजित पवारांना लवकरच लोकप्रियता मिळाली.
अजित पवारांना कमी कालावधीतच राजकीय उलटापालतीमुळे खासदार पदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे अजित पवार १९९१ च्या निवडणुकीत बारामती मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढले. त्यांनी ही निवडणूक जिंकली व जिंकल्यानंतर अधिकृतपणे राजकीय क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. या विजयाने त्यांचा राजकारणातील प्रवासाची दमदार सुरुवात झाली.
अजित पवारांनी राजकीय अस्तित्व बळकट करीत पक्षात स्वतः चे वेगळे स्थान निर्माण केले. अजित पवारांच्या कर्तृत्वावर विश्वास टाकून पक्षश्रेष्ठींनी त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यांनी त्या जबाबदाऱ्या खंबीरपणे पेलावल्या देखील.
अजित दादांनी १९९९ मध्ये, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला. त्यांनी महाराष्ट्र सरकार मध्ये कृषी मंत्री, ग्रामविकास मंत्री व ऊर्जा मंत्री अशा वेगवेगळ्या खात्यांचा पदभार स्वीकारला होता.
अजित पवारांना कृषिमंत्री म्हणून काम करण्यासाठी संधी मिळाली. त्यांनी त्या संधीचे सोने करत कृषी क्षेत्रात आपले योगदान दिले. त्यांनी या काळात कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांना शेती करायला पाठबळ म्हणून वेगवेगळ्या योजना राबवल्या. दरम्यानच्या काळात अजित पवारांनी सिंचन प्रकल्प राबवला. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे.
अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीत आव्हाने आली. त्यात प्रमुख २०१२ सालीचा “सिंचन घोटाळा” आहे. सिंचन घोटाळ्यामध्ये दादांवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्या वादामुळे त्यांना उपमुख्यमंत्री पदा वरून माघार घ्यावी लागली.