team Image

राजकीय कारकीर्द


अजित पवारांना कमी कालावधीतच राजकीय उलटापालतीमुळे खासदार पदाचा राजीनामा द्यावा लागला.

team Image

प्रारंभिक जीवन


२२ जुलै, १९५९ रोजी प्रभावशाली पवार कुटुंबात झाला. त्यांचे वडील अनंतराव पवार हे राज्यातील एक प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्व होते आणि या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे अजित पवारांना राजकारणाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले.

team Image

राजकीय प्रवास


राजकीय संस्कार लहानपणापासूनच दादांवर होत गेले. काका शरद पवार यांच्या कडून अजित दादांनी राज्यकारभार आणि राजकारणातील बारकावे याचे धडे घेतले. दादांनी १९९१ मध्ये बारामती मतदारसंघातून त्यांची पहिली लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय होऊन त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली.

आदरणीय अजित पवार बद्दल

अजित पवार साहेब

दिवसाचे १६-१७ तास सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आव्हान लीलया पेलणारे मा. श्री. अजितदादा पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपणारी तलवारच. सातत्याने गेली ३ दशके महाराष्ट्रासारख्या राज्याच्या राजकीय-सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या नेतृत्वाकडे असलेली सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी थक्क करणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असलेले श्री.अजित पवार नवमहाराष्ट्राचे शिल्पकार आहेत.

शिकवण सह्याद्रीची

वक्तशीरपणा, लोकांसाठी सतत उपलब्ध असणे, अडी-अडचणी सोडवणे, प्रश्न मार्गी लावणे, विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी अभ्यासपूर्ण चर्चा करून निर्णय घेणे आणि विकास साधताना कलात्मक दृष्टी जोपासण्याची वृत्ती सन्मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांची कारकीर्द जवळून पाहिल्यामुळेच श्री. अजित पवार यांच्या अंगी बाणवली गेली. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच पुढील २५-३० वर्षांचा विचार करून विकास करण्याचा श्री. अजित पवार यांचा प्रयत्न राहिला आहे.
अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले, शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.
अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे २२ जुलै १९५९ मध्ये श्री. अजित पवार यांचा जन्म झाला. लहान वयातच खांद्यावर आलेली कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलत असतानाच आजूबाजूच्या सामाजिक प्रश्नांची जाणीव त्यांच्यात निर्माण झाली. शेतकरी-कष्टकऱ्यांच्या संवेदना समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी धडाडीने काम करण्यास सुरुवात केली आणि तिथेच महाराष्ट्राच्या भावी संवेदनशील नेतृत्वाची पाळं-मुळं रुजली. दूधसंघ, विविध सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका या माध्यमातून महत्त्वाची पदे भूषवित सुरु झालेल्या प्रवासाला १९९१ साली नवे वळण लागले. खासदार, आमदार, राज्यमंत्री, अनेक महत्त्वाच्या खात्यांतील मंत्रीपदे आणि महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्रीपद ४ वेळा भूषविण्याचा बहुमान या कार्यकुशल नेतृत्वाला लाभला आहे. लोकभावना जाणून घेण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यात कुठलाही भेदभाव न करता ‘जनता दरबार’च्या माध्यमातून सत्ता असो वा नसो श्री.अजित पवार कायम लोकांच्या संपर्कात असतात. गतीमान प्रशासनासाठी ते नेहमीच आग्रही असतात. कोणाचंही ‘काम पूर्ण होणार असेल तर हो अन्यथा नाही’ असं स्पष्टपणे सांगण्याची कार्यपद्धती अजितदादांची ओळख बनली आहे.
img02
Mission Image

"अजित पवार - स्पष्ट ध्येय, धडक कृती!"

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘स्वातंत्र्य या सर्वोच्च मूल्याच्या जपणूकीची प्रेरणा या महाराष्ट्राला दिली. शाहू-फुले-आंबेडकरांनी प्रबोधन करुन समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान दिले आणि नवी दिशा दाखवली. साधू-संत, विचारवंत, कवी-लेखक, समाजसुधारक यांनी दाखविलेल्या या वाटेवरून चालताना सोबतीला प्रगतशील तंत्रज्ञानाची, संवेदनशील समाजनिर्मितीची, वैचारिक-आर्थिक समृद्धतेची जोड मिळायला हवी.

सन्माननीय पवार साहेब