व्यक्तिमत्व

जाणता लोकनेता

अनेक नेतृत्त्वाच्या भूमिका स्वीकारण्याची त्यांची क्षमता निर्विवाद आहे. पक्षातील नेतृत्व, विधिमंडळ सदस्य आणि नागपूरच्या जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणून त्यांनी समर्थपणे न्याय दिला आहे.

सामान्यांना आपलेसे करणे ही मोठी कठीण गोष्ट असते. देवेंद्र फडणवीसांना ती लिलया जमते; कारण ते जनसामान्यांच्या प्रश्नसमस्यांना मनापासून भिडतात. लोकांच्या गरजा ओळखून प्रश्नांना उत्तरे शोधण्याच्या कामात गढून गेलेले देवेंद्र फडणवीस त्यांच्या हरएक कृतीकार्यातून बघायला मिळतात. असाच नेता लोकांना ‘आपला’ वाटतो. कारण या नेत्याच्या शब्दांत पोकळ आश्वासन नसते तर प्रयत्नांच्या पूर्ततेची खात्री असते. कारण स्वत: देवेंद्र फडणवीसांना जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असते तेव्हाच एकत्रित जनशक्तीची जाणीवही असते.

उत्तरदायित्व आणि कार्यक्षमतेने अधिकाधिक चालत असलेल्या नवीन युगातील भारतीय राजकारणाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस हे जेव्हा ठोस परिणाम देऊन लोकांचा जनादेश जिंकतात तेव्हा ते नेहमीच झपाट्याने साध्य करणारे होते. लहान वयातच राजकारणात सामील झालेले देवेंद्र पहिल्यांदाच नगरसेवक बनले तेव्हा त्यांनी त्यांची तारुण्य ऊर्जा आणि दृष्टी लोकांच्या विश्वासात आणि प्रेमात बदलली. तेव्हापासून त्याचा आलेख वरच्या बाजूस आहे, ज्यावरून लोकांनी त्याला कामाचा माणूस म्हणून समजल आहे .

संवेदनशील लोकनेता

ओबीसी समाज बांधवांप्रमाणेच मराठा समाजाच्या बांधवांनाही पुरेसे प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी अविरत प्रयत्न सुरु आहेत.

महाराष्ट्रात मराठा समाजासाठी आरक्षणाचा कायदा 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना तयार करण्यात आला होता. ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने याच कार्यकाळात विधीमंडळात मंजूर झाले. त्यानंतर पुढे या आरक्षणाला कोर्टात आव्हान दिले गेले. तेव्हा सरकारच्या वतीने जोरदार लढा कोर्टात लढला गेला. हायकोर्टात तत्कालीन युती सरकारने घेतलेल्या मेहनतीमुळेच मराठा आरक्षण वैध ठरले. आजवर देशामध्ये आरक्षणाचे दोन कायदे वैध झाले, एक महाराष्ट्राचा आणि दुसरा तामिळनाडूचा. अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सरकारच्याच नाकर्तेपणा आणि अपुऱ्या समन्वयामुळे आरक्षण कोर्टात टिकले नाही.

हळुवार अशी संवेदनशीलता लाभलेला शरद पवार हा संवेदनशील माणूस ‘लोकनेता’ होतानाही संवेदनशीलच राहिला किंबहुना ही अखंड जागती संवेदनशीलताच त्यांना ‘लोकनेता’ या उपाधीपर्यंत घेऊन गेली.

जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपान दौर्‍यावर गेले होते, पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला चालना मिळण्याच्या दृष्टीने हा दौरा खूप महत्वपूर्ण होता आणि अपेक्षेप्रमाणे विविधांगाने यशस्वीही झाला.

मुंबईत परतल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दौरा अतिशय सकारात्मक झाल्याचे सांगत पुढे म्हणाले की, “2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी जे उत्कृष्ट संबंध जपानसोबत निर्माण केले, त्यामुळे जपान मोठ्या प्रमाणात भारताला सहकार्य करत आहे. ‘स्टेट गेस्ट’ म्हणून मला जपानने निमंत्रित केले होते. या दौर्‍यात जपान सरकारचे मंत्री, पंतप्रधानांचे सल्लागार, विविध कंपन्या, अधिकारी यांच्यासोबत बैठका झाल्या. राज्यात आपण वर्सोवा-विरार सी लिंक तयार करतो आहे, त्यासाठी मदत करण्यास जपान सरकारने सकारात्मकता दाखविली आहे.