महाराष्ट्रात मराठा समाजासाठी आरक्षणाचा कायदा 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना तयार करण्यात आला होता. ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने याच कार्यकाळात विधीमंडळात मंजूर झाले. त्यानंतर पुढे या आरक्षणाला कोर्टात आव्हान दिले गेले. तेव्हा सरकारच्या वतीने जोरदार लढा कोर्टात लढला गेला. हायकोर्टात तत्कालीन युती सरकारने घेतलेल्या मेहनतीमुळेच मराठा आरक्षण वैध ठरले. आजवर देशामध्ये आरक्षणाचे दोन कायदे वैध झाले, एक महाराष्ट्राचा आणि दुसरा तामिळनाडूचा. अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सरकारच्याच नाकर्तेपणा आणि अपुऱ्या समन्वयामुळे आरक्षण कोर्टात टिकले नाही.
ओबीसी समाज बांधवांप्रमाणेच मराठा समाजाच्या बांधवांनाही पुरेसे प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी अविरत प्रयत्न सुरु आहेत.
मराठा समाजासाठी कल्याणकारी योजना युती सरकारच्या कार्यकाळात सुरु झाल्या. मराठा बांधवांसाठी आतापर्यंत घेतलेले उल्लेखनीय निर्णय / सद्यस्थिती
महायुती सरकारने अधिसंख्य पदांच्या माध्यमातून शासकीय सेवेत भरतीचा निर्णय घेतला.
महायुती सरकारनेच मराठा समाजाची सुमारे 3553 अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले.
इतर योजना
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वैयक्तिक कर्जव्याज परतावा योजना
एकूण लाभार्थी: 67,148 ₹ 4850 कोटींचे कर्ज ₹ 516 कोटी व्याज परतावा
गट कर्ज व्याज परतावा योजना
एकूण लाभार्थी : 526 व्याज परतावा : ₹ 9.16 कोटी
राजर्षि छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा फायदा
2018-19 : 10,234 विद्यार्थी/ ₹90 कोटी 2019-20 : 12,907 विद्यार्थी/ ₹118 कोटी 2020-21 : 15,890 विद्यार्थी/ ₹149 कोटी 2021-22 : 19,009 विद्यार्थी/ ₹141 कोटी
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने नुकतीच सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बैठक संपन्न झाली.
“जालना येथे मराठा आंदोलनादरम्यान घडलेली घटना दुर्दैवी आहे, त्यावर विरोधकांचे निव्वळ राजकारण सुरु आहे. या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली असून, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. शासनामार्फत या घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.”
ओबीसी समाज बांधवांप्रमानेच मराठा समाजाच्या बांधवांनाही पुरेसे प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी अविरत प्रयत्न सुरु आहेत.
युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना 2000 आंदोलने झाली, मराठा समाजाचीही आंदोलने अतिशय शिस्तबध्द पध्दतीने झाली. त्याचे अनेकांनी कौतुक केले होते. तेव्हा बळाचा वापर कधीच झाला नाही. “लाठीचार्जचे आदेश हे कधीच मंत्रालयातून जात नाहीत, ते एसपी स्तरावर होत असतात.”
मराठा आरक्षणाचा कायदा 2018 साली युती सरकारने तयार केला.
उच्च न्यायालयात त्यानंतर केवळ दोन कायदे टिकले. एक महाराष्ट्राचा आणि दुसरा तमिळनाडूचा.
त्यानंतरही वारंवार उच्च न्यायालयात केसेस गेल्या मात्र कधीही स्थगिती मिळाली नाही.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात 09-09-2020 मध्ये त्यावर स्थगिती आली आणि 05-05-2021 ला तो कायदा रद्द करण्यात आला.
महायुती सरकारच्या कार्यकाळात मराठा समाजासाठी कल्याणकारी निर्णय घेतले गेले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत ₹ 4500 कोटींचे कर्ज, 504 अभ्यासक्रमांची प्रतिपूर्ती, यूपीएससी-एमपीएससी परीक्षेसाठी शिष्यवृत्ती योजना, सारथीच्या विभागीय कार्यालयांसाठी ₹ 1015 कोटी देण्यात आले.
मराठा आरक्षणाबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.